प्रा. गणेश शेलार यांचा राष्ट्रीय शिक्षक वैभव पुरस्काराने सन्मान

__ भिवंडी (प्रतिनिधी) :भिवंडीतील आठगाव विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कोनयेथील प्राध्यापक गणेश शेलार यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याबददल राष्ट्रीय शिक्षक वैभव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून नाशिक येथे रोटरी क्लब सभागृह गंजमाळ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सच्चिदानंद यादव, राज्य प्रदेशाध्यक्ष महेंद्र देशपांडे, अभिनेत्री शिल्पी अवस्थी, प्रसन्ना जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात शैक्षणिक सामाजिक, साहित्य, कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करीत असलेल्या गुणवंतांना देखील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.