भिवंडी(प्रतिनिधी):- नागरिक त्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरातील विविध डाव्या विचा रसरणीच्या कामगार संघटनांनी बुध वारी पुकारलेल्या भारत बंदला भिवंडी शहरात अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने भारत बंद असल्याचे चित्र समोर आले आहे. बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास भिवंडीत लालबावटा कामगार युनियन संघटनेच्या वतीने भिवंडी महानगरपालिका समोरील जकात नाका येथे कॉम्रेड सुनिल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले. या आंदोल नात विडी कामगार महिला व यंत्र माग कामगार मोठया संख्येने सह भागी झाले होते. या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको कर ण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचा कामगार विरोधी धोरणाचा तसेच एनआरसी व सीएए या कायद्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी शेकडो आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेऊन काही वेळाने वैयक्तिक जामिनावर सोडून दिले.
भिवंडीत नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधात डाव्या संघटनांची निदर्शने