___ मुंबई(प्रतिनिधी):- मुलीच्या विनयभंग प्रकरणी पुणे मोटार परिवहन विभागाचे पोलिस उपमहानिरिक्षक निशिकांत मोरे यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्या निलंबनाचा आदेश गृह विभागामार्फत निर्गमित करण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. __निशिकांत मोरे यांच्याविरूध्द तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण अन्वेषणाधिन आहे. तसेच मोरे यांच्याविरूध्द पोलिस महासंचालक यांनी शासनास सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने त्यांच्याविरूध्द शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आज गृह विभागामार्फत शासन आदेश निर्गमित करून मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.
पोलिस उपमहानिरिक्षक निशिकांत मोरे निलंबित
• Somnath Thackeray